award

एम स्टाईल डान्स अकॅडमीच्या विधार्थ्यांचे यश; पोर्तुगालमधील नृत्य स्पर्धेसाठी निवड

Share

बेळगावातील एम स्टाईल डान्स अँड झुंबा फिटनेस अकॅडमीच्या विध्यार्थ्यांची पोर्तुगालमध्ये होणाऱ्या डान्स वर्ल्ड कप-2023 या जागतिक नृत्यस्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या डान्स वर्ल्ड कप-2023 नृत्यस्पर्धेच्या निवड चाचणीत एम स्टाइलच्या प्रेरणा जाधव हिने प्रथम क्रमांकासहित सुवर्णपदक मिळवले. कृतिका गावडे व सान्वी मुंगारे या विद्यार्थिनींनी दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली आहेत.

गटनिहाय स्पर्धेत पार्थ गोणबरे, वैष्णवी माळगी, तन्वी इटगीकर, प्रथमेश मिसाळ, माही माळगी, सृष्टी भंडारी, श्रावणी गोधोळकर, संजना चव्हाण, अथर्व भंडारी, कृतिका गावडे, सान्वी मुंगारे या विध्यार्थ्यानी दुसऱ्या क्रमांकासहित रौप्य पदके मिळवली आहेत. निवडचाचणी नृत्यस्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध नृत्य परीक्षक जुलिनो अलंकटरा यांनी केले. एकूण 200 डान्सर्सनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

 

या अटीतटीच्या नृत्य स्पर्धेत एम स्टायलरच्या विद्यार्थ्यांची दोन सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक मिळवून पोर्तुगालमध्ये होणाऱ्या जागतिक नृत्यस्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 30 जून ते 8 जुलै 2023 या दरम्यान होणार आहे. गेली 6 वर्षे एम स्टाइलच्या विध्यार्थ्यानी जागतिक नृत्य स्पर्धेत आपले नाव कोरले आहे. या यशाबद्दल एम स्टाईल डान्स अँड झुंबा फिटनेस अकॅडमीच्या विध्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना अकॅडमीचे संचालक नृत्य प्रशिक्षक महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Tags: