खानापूर शहरातील मुख्य रस्त्यावर लोकमान्य भवनासमोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात मतदारांना वाटण्यासाठी आणलेले 7 लाखांचे घबाड निवडणूक अधिकारी व पोलिसांनी जप्त केले.


खानापूर शहरातील मुख्य रस्त्यावर लोकमान्य भवनासमोर एक वाहन संशयास्पद स्थितीत उभे असलेले निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने वाहनांची तपासणी केली असता, त्यात खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले भाजप नेते दिलीप कुमार यांचा फोटो व नाव असलेल्या बॅगेत भाजप पक्षाचे चिन्ह असलेल्या वस्तू होत्या.

यात 1,54,000 रु. किंमतीच्या एकूण 280 साड्या, 1,350 रु. किंमतीची 09 वॉल क्लॉक, रु.48,360 किंमतीच्या 100 पाईपर ब्रँडच्या 750 मिलीच्या 15 लीटरच्या दारूच्या बाटल्या असा एकूण 5,00,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि वाहनासह एकूण 7,03,710 किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. निवडणूक
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेंडीगेरे ग्रामपंचायत सदस्य संगप्पा मल्लिकार्जुन कुडची यांनी मिनी माल वाहनातून बेळगावातील बॉक्साईट रोडवरील बसस्थानकावरून हा माल आणला होता. वाहन चालक लियाकत अहमद बशीर नदाफ, रा. अमन नगर, बेळगाव याच्या मालकीचे आहे. अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरु केल्याचे सांगण्यात आले.


Recent Comments