Banglore

अशोक चंदरगी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “गडीनाड चेतना” पुरस्कार प्रदान

Share

कर्नाटक एकीकरणाचे वीराग्रणी डॉ. जयदेवताई लिगाडे यांच्या नावाने कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाने जाहीर केलेला “गडीनाड चेतना” पुरस्कार वितरण समारंभ बेंगळूर येथील गांधी भवनमध्ये पार पडला.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते बेळगावातील कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी व अन्य विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर कंबार, कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर, दुसरे पुरस्कार विजेते एम. एस. सिंधूर, माजी मंत्री श्रीमती राणी सतीश, श्रीमती लीलादेवी प्रसाद,

कासारगोड एडेनिरू मठाचे प्रतिनिधी, प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मत्तीहळ्ळी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Tags: