मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज त्यांच्या बेंगळुरमधील रेस कोर्स परिसरातील अधिकृत निवासस्थानी स्मशान कामगारांसोबत नाश्ता केला.
मुख्यमंत्री झाल्यापासून बसवराज बोम्मई यांनी तळागाळातील लोक, दलित, सफाई कामगार आदींसोबत नाश्ता करून सर्वजण समान असल्याचा संदेश देणारे अनोखे अभियान सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या बेंगळुरमधील रेस कोर्स परिसरातील अधिकृत निवासस्थानी स्मशान कामगारांसोबत नाश्ता केला.
यावेळी मागासवर्गीय कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, आलेमारी विकास महामंडळाचे अध्यक्ष के. देवेंद्र नाथ नाड, माजी खासदार चलवादी नारायणस्वामी आदी उपस्थित होते.


Recent Comments