Banglore

कोविडबाबत उद्या मार्गदर्शक तत्वे जारी करणार : मुख्यमंत्री बोम्मई

Share

कोविडबाबत विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र दक्षता घेणे खूप आवश्यक आहे. उद्या यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेंगळूर येथे आज रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोविडचे थैमान पुन्हा सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. राज्य सरकारतर्फेही आम्ही काही सूचना केल्या आहेत. कोरोनाची वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. लोकांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु दक्ष राहण्याची खूप गरज आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या साथीमुळे राज्यावर आणि देशावरही परिणाम झालेला आहे. या पार्श्वभूमीवर विशेषज्ञांशी चर्चा करून उद्या काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. त्यांचे पालन लोकांनी जरूर करावे असे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.

एकंदर, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र दक्षता घेणे खूप गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.

Tags: