Belagavi

विराट लिंगायत पंचमसाली पदयात्रा

Share

लिंगायत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सुवर्णसौधला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता . त्यासाठी कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. दुपारपर्यंत ही पदयात्रा सुवर्णसौधवर धडकली .

सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावातून पंचमसाली समाजाच्या पदयात्रेला प्रारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला. पंचमसाली समाजाला 2-ए प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातर्फे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून सतत आंदोलन करण्यात येत आहे. आता ‘करो या मरो’ आंदोलनाची हाक देण्यात आली असून, स्वामीजींनी दिलेला अल्टीमेटम आज संपला. त्यामुळे पंचमसालींचा सुवर्णसौधवर निषेध मोर्चा काढून भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे . करीकट्टीपासून हिरेबागेवाडीमार्गे सुवर्णसौधपर्यंत पदयात्रा काढण्यात येत आहे. बसव जय मृत्युंजय स्वामीजीनी हिरेबागेवाडीतील श्री बसवेश्वरांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला . यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या .

या मोर्चादरम्यान, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या आंदोलकांनी फुलून गेला होता . जयमृत्युंजय स्वामीजी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक आमदार आणि नेते यामध्ये सहभागी झाले होते.

पंचमसाली समाजाच्या वतीने विराट पंचलक्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पंचमसाली समाजाला २ अ आरक्षणाच्या मागणीसाठी हा विराट मोर्चा सवदत्ती ते विधानसौध असा काढण्यात आला . स्वामीजींसह लाखोपंचमसाली बांधव या मोर्चात सहभागी झाले होते .

Tags: