नागपूर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले विधान कर्नाटकाच्या जलसिंचन मंत्र्यांना चांगलेच झोंबले आहे. यावरून त्यांनी चक्क महाराष्ट्राचा बाप काढला आहे.
बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकचे जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ चांगलेच बरळले. महाराष्ट्रातील धरणांची उंची वाढवणे आणि पाणी अडवणे हे महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही. महाराष्ट्र विधानसभेमध्ये कर्नाटक विरोधात वक्तव्य केले, धरणाची उंची वाढवा, कर्नाटकला पाणी सोडू नका म्हणता येणार नाही. पाणी ही त्यांची मालमत्ता नाही, त्यांच्या बापाची मालमत्ता नाही.
असे वादग्रस्त वक्तव्य केले. धरणाची उंची वाढवणे, पाणी न सोडणे हे त्यांचे विषय नाहीत सभागृहात बोलताना त्यांनी नीट बोलावे अशी मल्लिनाथी कारजोळ यांनी केली.


Recent Comments