Belagavi

कोंडसकोप्प येथे रयत संघ व हरित सेना यांच्या नेतृत्वात धरणे

Share

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी , कोंडसकोप्प येथे रयत संघ व हरित सेना यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन छेडण्यात आले .

केंद्र सरकारने उसाला एफआरपी दर ठरवून दिला आहे . उसाला 3500 रुपये प्रति टन भाव ठरवून शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे. त्याचप्रमाणे शेतकरी विरोधी कृषी कायदा मागे घ्यावा वीज खाजगीकरणाचे बिल मागे घ्यावे कळसा-भांडुराची कामे मुदतीत पूर्ण करण्याची मागणी यावेळी शेतकरी नेत्यांनी केली .

आमदार सतीश जारकीहोळी व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या व सरकार शेतकरी विरोधी असल्याचा निषेध केला.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनस्थळी , आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शासनाचा एकही प्रतिनिधी न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला . यावेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली . यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली .

Tags: