Belagavi

सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम; माधुस्वामी यांचे तुणतुणे

Share

सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम आहे. महाराष्ट्रानेच महाजन आयोग नेमण्याची मागणी केली होती. आता ते जर अहवाल फेटाळत असतील तर आम्ही ते मान्य करणार नाही. कन्नड भाषेच्या रक्षणाच्या बाबतीत आम्ही कसलीही तडजोड करणार नाही असे कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी दिली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी सुवर्णसौधमध्ये कायदामंत्री माधुस्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रानेच महाजन अहवाल नेमण्याची मागणी केली होती. हा प्रश्न एकदाच सुटावा म्हणून तत्कालीन कर्नाटक सरकारने त्याला सहमती दर्शवली होती. आता त्याच आयोगाचा अहवाल महाराष्ट्र मान्य करत नसेल तर आम्ही ते सहन करणार नाही. कन्नड भाषेच्या रक्षणाच्या बाबतीत सरकार कसलीही तडजोड करणार नाही.

एससी-एसटी आरक्षण विधेयकावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिल्याच्या मुद्द्यावर माधुस्वामी म्हणाले, आम्ही विधेयक मांडले आहे आणि ते आज यादीत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांशी चर्चा करून सर्वपक्षीयांनी संमती दिल्यानंतरच आम्ही हे विधेयक मंजूर करून घेतले आहे. यावरून राजकीय स्टंट काँग्रेसने सुरू केला आहे. आम्ही नव्हे. सर्वांनी बसून चर्चा केली आणि सर्वांच्या सहमतीने हे विधेयक मांडले. या बैठकीला सिद्धरामय्या, कुमारस्वामी दोघेही उपस्थित नव्हते का? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही काय करता ते करा, एससी-एसटीना मदत करा असे म्हणणारे कोण आहेत? आम्ही तुमचा सल्ला घेतला आणि ते केले. आता अशी राजकीय टीका करणे योग्य नाही, हे तुम्हाला शोभत नाही अशा शब्दांत माधुस्वामी यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले.

Tags:

/belagavi-law-minister-madhuswamy/