मंत्री अश्वथ नारायण म्हणाले की, सभापतींनी सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना फोटो लावण्याचा सल्ला दिला आणि त्यानुसार सावरकरांचे भावचित्र सभागृहात लावण्यात आले.
बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री अश्वथ नारायण यांनी सांगितले कि , यापूर्वी अध्यक्षांनी सर्वांना विश्वासात घेऊन प्रत्येकाचे भावचित्र लावण्याचा सल्ला दिला होता. टप्प्याटप्प्याने सर्व महापुरुषांचे फोटो लावले जातील. त्यानुसार सावरकरांचे चित्र लावण्यात आले आहे.
ते म्हणाले की,सावरकरांचे भावचित्र हा शेवटचा फोटो नाही . काँग्रेस नेत्यांनी या प्रश्नावर राजकारण करणे थांबवून सावरकरांच्या कर्तृत्वाचा आणि बलिदानाचा विचार करावा, असे ते म्हणाले.


Recent Comments