आपण नेमके कोणाच्या बाजूने? देशभक्तांच्या की दहशतवाद्यांच्या बाजूने हे काँग्रेसने स्पष्ट करावे असे आव्हान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिले.
बेंगळूर येथे आज शुक्रवारी राष्ट्रीय सैनिक स्मारक व्यवस्थापन ट्रस्टतर्फे विजय दिवस समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचे उदघाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री बोम्मई यांनी संवाद साधला. मतदार यादीतील बनावट मतदार, एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नावे असलेले मतदार ओळखण्यासाठी निवडणूक आयोगाने नवी प्रणाली लागू केली आहे. राज्यातील बनावट मतदारांचा आम्हीही शोध घेत आहोत. काहीजणांना मतदार यादीतील घोळाबाबत अटकही झाली आहे. 2017मध्ये महान फौंडेशनला आदेश दिला होता हे डीकेशिनी विसरू नये असा टोला त्यांनी हाणला.
‘राज्य सरकारने भ्रष्टाचार झाकण्यासाठी मंगळूर बॉम्बस्फोट प्रकरण पेटविले’ असे विधान केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केले आहे. त्यावरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, आपण नेमके कोणाच्या बाजूने? देशभक्तांच्या की दहशतवाद्यांच्या बाजूने हे काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट करावे. एक व्यक्ती कुकर बॉम्बस्फोटाला लागणाऱ्या सर्व वस्तू कुकरमधून घेऊन जाताना स्फोट झाला, याआधीही तो अशा 2-3 देशविरोधी प्रकरणात सहभागी होता, इतकेच काय त्याचे परदेशातही दहशतवादी कनेक्शन आहे, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या सर्व बाबी तपासात उघड झाल्या असताना केपीसीसी अध्यक्षांनी असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही.
गैरकृत्ये लपविण्याची संस्कृती काँग्रेसची आहे, आमची नव्हे. एका विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण करण्याचे काँग्रेसचे हे जुने तंत्र आहे. त्यातूनच डीकेशिनी हे विधान केले आहे. यामुळे त्या विशिष्ट समाजाची मते मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे. पण आता लोक शहाणे झाले आहेत. काँग्रेसचे हे तंत्र आता चालणार नाही. दहशतवादी संपूर्ण पुराव्यासह सापडले तरी त्या एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. त्यामुळे देशाचे, सैनिकांचे आणि आमच्या पोलिसांचे मनोधैर्य ढळते. त्यामुळे काँग्रेसने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. बाईट
एकंदर, डीकेशींच्या विधानाचा मुख्यमंत्री बोम्मई यांनी चांगलाच समाचार घेतल्याचे यावेळी दिसून आले.


Recent Comments