Belagavi

वाढत्या गुन्हेगारी संदर्भात गृहमंत्र्यांशी आ.अभय पाटील करणार चर्चा

Share

बेळगाव शहर आणि जिल्हाभरात गुन्हेगारी वाढत आहे . वाढत्या गुन्हेगारीला आला घालण्यासाठी फक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नाहीत तर वर्षानुवर्षे एकाच पोलीस स्थानकात ठाण मांडून असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील बदली व्हायला हवी या संदर्भात आपण , येत्या अधिवेशन काळात गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आ . अभय पाटील यांनी सांगितले .

आज ई बायसिकल शेअरिंगचे लोकार्पण केल्यानंतर , पत्रकारांनी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलणार असा प्रश्न केला . पोलीस आयुक्तालय झाल्यापासून प्रत्येक पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत तरीही गुन्हेगारी आटोक्यात का येत नाही ? याला उत्तर देताना आ . अभय पाटील म्हणाले कि , वरिष्ठ अधिकारी वर्ग वगळता अन्य पोलीस कर्मचारी गेली 10 ते 15 वर्ष प्रत्येक पोलीस स्थानकात ठाण मांडून बसले आहेत .त्यांचे गुन्हेगारांना अभय असल्याने गेल्या चार वर्षात कोणतीही मोठी कारवाई झाली नाही असे मला वाटत आहे असे आ . अभय पाटील म्हणाले .

फक्त एसपी , पोलीस आयुक्त असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नाही तर कनिष्ठ पातळीवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यादेखील होणे आवश्यक आहे . एकाच पोलीस स्थानकात बरीच वर्षे सेवा बजावल्याने त्यांचे स्थानिक गुन्हेगारांशी लागेबांधे असतात . याबद्दल मी येत्या दोन दिवसात जनतेशी संवाद कार्यक्रम घेणार आहे . तसेच गृहमंत्र्यांच्या निदर्शन देखील ही बाब आणून देणार आहे असे अभय पाटील यांनी स्पष्ट केले .

Tags: