काँग्रेस नेते मधु बंगारप्पा यांनी बेळगाव शहरात पत्रकार परिषद घेऊन , भाजपवर हल्लाबोल केला आहे .
बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले कि , राज्यात जिल्हानिहाय ओबीसी मेळावा होणार आहे . त्यानंतर राज्यस्तरीय ओबीसी मेळावा होणार आहे यावेळच्या निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा खास असेल यावेळी संबंधित जिल्हानिहाय जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.
भाजपने जातीजातीत फूट पाडली आहे.धर्माधर्मात फूट पाडत आहे. आता ते शेतकऱ्यांना तोडण्याचे काम करत आहेत. भाजपकडे अधिक व्यावसायिक दृष्टी आहे. काँग्रेस पक्ष असताना शेतकऱ्यांना उपकरणे देण्यासाठी अनुदान दिले जात होते. पण भाजप सरकार सबसिडी काढून घेत आहे शेतकऱ्यांना मोफतवीज दिली पाहिजे परंतु आता मीटर बसविण्याचा घाट घातला आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाविषयी बोलताना मधू बंगाराप्पा म्हणाले कि , कर्नाटकातील कोणतीही जागा सोडण्याचा प्रश्नच नाही . आपल्या देशात कायदा सर्वांसाठी एकच आहे . त्यासाठी न्यायालयीन लढा देणे हाच यावरच उपाय आहे . सीमावाद आता न्यायालयात आहे आमच्या नेत्यांनी जाहीरनाम्यात सीमा वाद आणा असे म्हटले आहे. त्यामुळे सीमावादाचा मुद्दा काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात राहणार आहे . आमचे वडील बंगारप्पा यांनी स्वतः बेळगावचे कन्नड महापौर केले.
पहिला कन्नड महापौर काँग्रेस पक्षानेच केला होता महाराष्ट्र कन्नडिगांसाठी काँग्रेस पक्षाचा आवाज नेहमीच बळकट असतो. सीमाप्रश्न हे कायदेशीर मार्गाने सोडवण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्याशिवाय मानवतेच्या दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे. निवडणुकीच्या काळात सीमा वाद नेहमीच समोर येतात
यावर कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. याबाबत मी वरिष्ठांशी बोलणार आहे. सीमाप्रश्नावर अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली या पत्रकार परिषदेत आमदार गणेश हुक्केरी, आमदार चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते .


Recent Comments