बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानची शेत जमीन गेली 40 वर्षे एका कुटुंबाकडे होती. ती जमीन गावक-यांच्या एकीमुळे देवस्थानच्या ताब्यात घेण्यात आली. त्या शेत जमीनीचा आज समस्त मुचंडी ग्रामस्थांच्या वतीने पंचवार्षिक लिलाव करण्यात आला.

मुचंडी गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थानची शेत जमीन गेली 40 वर्षे एका कुटुंबाकडे होती. ती त्या कुटुंबाकडून परत घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेऊन अमलात आणला. त्यानंतर जमीन देवस्थानच्या ताब्यात घेऊन आज सोमवारी जमिनीचा समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव करण्यात आला. यानिमित्त आज गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून कट्टबंध वार पाळण्यात आला. गावातील माळजमिनीवर या जमिनीचा पंचवार्षिक लिलाव करण्यात आला. गावातील नागरिक मोठ्या संख्येने या लिलावात सहभागी झाले होते.



Recent Comments