Belagavi

ऑटोमध्ये राहिलेले लाखोंचे दागिने परत केल्याबद्दल ऑटो चालकाचा पोलिसांकडून गौरव

Share

कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी ऑटोचालक भरमसाठ पैसे मागतात, असे सार्वजनिक क्षेत्रात ऐकायला मिळते. पण खाकी कपडे घातलेल्या ऑटोचालक प्रामाणिक सुद्धा असतात हे अक्षरशः खरे आहे .

हुबळीतील चन्नम्मा सर्कल येथून ऑटोमध्ये बसलेले प्रवासी अरविंदनगर येथे उतरताना त्यांची एक बॅग रिक्षात विसरले .

बॅगेत लाखोंचे दागिनेही होते. दरम्यान, मागच्या सीटवर प्रवासी बॅग विसरून गेल्याचे दिसून येताच ऑटोचालक राजू बिंगे याने प्रामाणिकपणे ती बॅग घेऊन जुनी हुबळी पोलिस ठाणे गाठले . आणि ती बॅग पोलिसांच्या हवाली केली . त्यानंतर ऑटोचालक राजू बिंगे याने जुने हुबळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांना बॅग परत करून प्रामाणिकपणा दाखवला.
पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण व कर्मचाऱ्यांनी स्थानकात प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या ऑटो चालकाचे अभिनंदन करून ऑटो चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

 

Tags: