बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात मराठी साहित्य-संस्कृतीचा जागर सुरु झालाय. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला शानदार प्रारंभ झाला आहे.

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात आज, रविवारी श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी शानदार ग्रंथदिंडी काढून मराठी साहित्य संस्कृतीचा जागर सुरु झाला. गावातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या पालखीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची संमेलनस्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. शालेय विध्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशात भगवे फेटे परिधान करून या दिंडीत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

या संमेलनात आज दिवसभरात कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, अध्यक्षीय भाषण आदी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून मराठी साहित्य-संस्कृतीवर विचारमंथन करण्यात येणार आहे. विविध साहित्यिक, विचारवंत या अनुषंगाने मराठी साहित्य-संस्कृतीवर उद्बोधक विचार मांडणार आहेत.


Recent Comments