Banglore

गुजरात निवडणुकीच्या निकालाचा राज्यातील निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होईल -मुख्यमंत्री बोम्मई

Share

गुजरात निवडणुकीच्या निकालाचा राज्यातील निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होईल असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले .

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला . या निवडणुकीत भाजपने 150 हुन अधिक जागा जिंकून , दणदणीत विजय मिळवला . यासंबंधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळूरमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले कि , आज गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे . याचा परिणाम आपल्या राज्यातील निवडणुकांवर निश्चितपणे होईल . राज्यात आम्ही सुशासन दिले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास सार्थ ठरला आहे .

Tags: