हिंडाल्को कंपनीने गावातील लोकांच्या जमिनी कवडीमोलाने घेतल्या आहेत . मात्र इथल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत अशी नाराजी यमनापूर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे .
हिंडाल्को कंपनीचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे . प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांच्या तसेच जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे . मात्र हिंडाल्को कंपनीचे अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत . याकडे लोकप्रतिनिधी देखील लक्ष द्यायला तयार नाहीत .
यासंदर्भात यमनापूर गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन , हिंडाल्को कंपनीच्या विरोधात आवाज उठवण्याचे निश्चित केले आहे


Recent Comments