Banglore

पिकांवरील बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावावर उपाययोजनेची १० कोटी रु . जारी

Share

पिकांवरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात सावधगिरीची उपायोजना करण्यासाठी १० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत आणि ही रक्कम चिक्कमंगळूर आणि शिमोगासह डोंगराळ भागातील चारही जिल्ह्याना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले .

हरिहरपूर हेलिपॅडवर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी , मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली . सरकारी विद्यापीठाची टीम अभ्यासासाठी पाठवली आहे . केंद्र सरकारचे तज्ञदेखील अभ्यासासाठी चिक्कमंगळूरला आले आहेत . सततच्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे , हा रोग एकीकडून दुसऱ्या भागात पसरत आहे . बुरशी नष्ट करण्यासाठी औषध फवारणी केली जाईल . ते म्हणाले कि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजन केल्या जातील आणि शास्त्रज्ञांनी शिफारस केलेल्या उपायांची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल.

ते म्हणाले कि आ . कुमारस्वामी यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले आहे . आणि जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांशी या आधीच बोलले गेले आहे आणि सर्व प्रकारचे संरक्षण आणि चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

Tags:

precautions-taken-to-tackle-viral-diseases-cm-bommai/