Belagavi

मारहाण प्रकरणातील सर्वाना अटक करून द्या शिक्षा : जखमी युवकाच्या कुटुंबीयांची मागणी

Share

क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका युवकावर दगडाने हल्ला करणाऱ्यांना अटक करून त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी निवेदन जखमी युवकांच्या कुटुंबीयांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ . एम एस बोरलिंगय्या यांच्याकडे निवेदनद्वारे केली .

यासंबंधी हकीकत अशी कि , बेळगाव शहरातील , भाग्यनगर परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली होती . क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तसेच दगडाने हल्ला करून आशिष बाबाजी शेणवी नामक युवकाला जखमी करण्यात आले होते . या आरोपावरून , टिळकवाडी पोलिसांनी अनगोळ येथील दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले . मात्र या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही .


त्यामुळे आज जखमी आशिष शेणवी यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस आयुक्त डॉ . एस एम बोरलिंगय्या यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली . (फ्लो )
यानंतर माध्यमांना माहिती देताना जखमीच्या नातेवाईक गीता दळवी यांनी सांगितले कि , आमचा मुलगा दुबईत नोकरी करतो . आठ दिवसांपूर्वी तो सुटीवर गावी आला आहे . मंगळवारी रात्री जेवण करून तो आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होता . त्यावेळी एक दुचाकी भरधाव आली पण थोडक्यात अपघात टळला . त्या दुचाकीवरील मुलांना याचा जाब विचारल्याने त्यांनी आमच्या मुलाला जबर मारहाण केली . आमच्या मुलावर उपचार सुरु आहेत . या प्रकरणातील सर्व आरोपीना पकडून त्यांना शिक्षा करावी जेणेकरून आम्हाला न्याय मिळाले आणि दादागिरी करणाऱ्या अन्य तरुणांना वचक बसेल .

जखमी आशिष याच्या आईने सांगितले कि , या प्रकरणात फक्त दोघांना अटक करण्यात आली आहे . अजून दोघांना पोलिसांनी अटक केलेली नाही . पोलीस देखील ही मारहाण नसल्याचे सांगत आहेत . या प्रकरणाचा नीट तपास करून उर्वरित दोघा आरोपीना देखील लवकरात लवकर अटक करावी आणि ह्या सर्व आरोपीना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली . (बाईट )
यावेळी शेणवी कुटुंबियांसह त्याचे नातेवाईक आणि हितचिंतक उपस्थित होते .

Tags:

bhagya-nagar-residents-memo-to-police-commissioner