Chitradurga

भाजपमध्ये नाहीत कसलेही मतभेद : मुख्यमंत्री बोम्मई

Share

भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.

मुरुघा मठ परिसराच्या हेलिपॅडवर आज मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चित्रदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री बी. सी. पाटील गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात आहेत. त्यामुळे आपण कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक घराला 10 हजार लिटर मोफत पाणी देण्याचा विचार सरकारने केलेला नाही, असे याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी, जर जेडीएसला बहुमत मिळाले तर अल्पसंख्याक व्यक्तीला मुख्यमंत्री बनवतील असे म्हटले होते. त्यावर बोलताना हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे याबद्दल कोणतेही विधान करणार नाही असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.

मुरुघा मठ प्रकरणाबाबत डीसींनी सरकारला दिलेल्या अहवालावर केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले की, हा अहवाल कायदा विभागाकडे आहे आणि लवकरच पुढील कारवाई केली जाईल. मुरुघा मठ स्वामींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी आमदाराच्या अटकेबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून, पोलीस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदर विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Tags:

bjp-has-no-disagreement-cm-bommai/