Belagavi

दहशतवादी कारवाया म्हणजे काँग्रेसच्या कर्माची फळे : पी. राजीव यांचा गंभीर आरोप

Share

देशात आणि राज्यात होत असलेल्या दहशतवादी कारवाया ह्या काँग्रेसच्या कर्माची फळे असल्याचा गंभीर आरोप तांडा विकास महामंडळाचे अध्यक्ष पी.राजीव यांनी केला.

बेळगाव येथे बुधवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संबोधित केले. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या मानसिकतेमुळे भारत दहशतवादी कारवायांमुळे हैराण झाला आहे. पोलिसांच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता शरिकने मंगळुरूमध्ये मोठा कट रचला होता. मोठा स्फोट झाला असता तर काँग्रेसने विनाकारण भाजपला दोष दिला असता, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

पुलवामा हल्ला झाला तेव्हा, चर्चवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी सभा घेत होते. सतीश जारकीहोळी सांगतात हिंदू म्हणजे अश्लील. मुस्लिमांनो, जिहादी मानसिकता असलेल्यांचा तुम्ही निषेध करत आहात का, असा सवाल त्यांनी केला.

भाजप म्हटले कि , राष्ट्रवाद प्रथम येतो, देशाच्या संस्कृतीवर प्रेम करणारी व्यक्ती हिंदू आहे आणि राष्ट्रवाद वाढवण्याचे काम करत आहे.

मंगळुरू येथील कुकर बॉम्बस्फोट प्रकरणात जखमी झालेल्या शरिकवर उपचार सुरू आहेत. माहिती गोळा केल्यानंतर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र भेट देऊन बैठक घेणार आहेत. ते म्हणाले , की भारत सरकार कठोर पावले उचलण्यास तयार आहे.  बेळगाव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

belagavi-p-rajeev-allegations-on-congress/