Banglore

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते नक्की पार पडेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.

चित्रदूर्गला रवाना होण्यापूर्वी , मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळूर ठेवील कव्हर निवासस्थानाजवळ माध्यमांशी संवाद साधला . ते म्हणाले कि , जत तालुका हा तीव्र दुष्काळग्रस्त तालुका आहे . त्यांना मी सर्व प्रकारची मदत करण्याची हमी दिली आहे . जत तालुका कर्नाटकात समिती करावा यासाठी तिथल्या सर्व ग्राम पंचायतींनी ठराव केला आहे . मी हा विषय गांभीर्याने घेतला आहे.

ते पुढे म्हणाले कि , महाराष्ट्रातील कन्नड शाळांच्या विकासासाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतला आहे . महाराष्ट्रामध्ये निवास करणाऱ्या कन्नडिगांपैकी ज्या कोणाचा एकीकरण आंदोलनात सहभाग होता त्यांनी आपली कागदपत्रे , दाखले सादर करावीत . सरकारकडून त्यांना पेन्शन लागू करण्यात येईल . ते पुढे म्हणाले कि , राज्याराज्यातील जनतेत फूट पाडण्याचे काम महाराष्ट्र सरकार तसेच मुख्यमंत्र्यांनी करू अशी मी त्यांना विनंती करतो . दोन्ही राज्यात सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे . सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडेन अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांसमोर दिली.

एकंदरीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी , आपण सर्व भाषिक जनतेला समान लेखत असल्याचे स्पष्ट केले .

Tags: