Belagavi

लव्ह जिहादविरोधात समाजातील प्रत्येक घटकाने जागृत होणे आवश्यक

Share

जस्टीस फॉर श्रद्धा ,भारत माता की जय,वंदे मातरम्,लव जिहादला विरोध करा अशा घोषणांनी हमारा देश संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

शनिवार दि.19नोव्हेबर रोजी झांसीची राणी लक्ष्मीबाईंच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन टिळकवाडीतील आईएमआर महाविद्यालयापासून ते आरपीडी सर्कल पर्यंत श्रध्दाच्या क्रुर हत्येचा निषेध करीत मोर्चा काढण्यात आला.श्रध्दाला न्याय द्या,अपराध्याला त्वरित फाशी द्या,लव जिहाद थांबवा,तसे कडक कायदे करा असे फलक हाती धरीत मागण्या करण्यात आल्या.

यावेळी बोलताना संघटनेच्या एका महिला कार्यकर्त्या सुनीता पाटणकर यांनी सांगितले कि लव्ह जिहाद हा प्रकार अतिशय समाजाला घातक आहे . देशाला नेस्तनाबूत करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आईवडिलंनीच नाही तर समाजातील प्रत्येक घटकाने जागृत होणे गरजेचे आहे.

या मोर्चा दरम्यान आजुबाजूच्या महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीसुध्दा उस्फुर्तपणे मोर्चात सामील झाल्या हे विशेष.यावेळी बऱ्याच स्त्री-पुरुष व युवकांनी यात भाग घेतला.सौ.सुनिता पाटणकर,व्येंकटेश शिंदे, किशोर काकडे, संतोष कागवाडे आदिनी मनोगत व्यक्त केले. संदीप भीडे, लक्ष्मीकांत कोटगी, टी. विजयकुमार, परशुराम मंगनीक, मधु मेणसे, पवन जोशी, अजीत पाटील, मल्लीकार्जुन कोकणी यांनी मोर्चा यशस्वी करण्या करिता जबाबदारी उचलली.

Tags:

justice for shraddha