Belagavi

बेळगाव तालुका सीरीगन्नड महिला वेदिकेचे उदघाटन

Share

पुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे . त्यासोबतच जीवन शिक्षण देखील महत्वाचे आहे . इतरांच्या कष्टात व सुख दुःखात सहभागी होऊन , गोरगरिबांना दानधर्म करण्याचे मानवतावादी मूल्य अंगिकारल्याने जीवन सफल होते असा अभिप्राय सीरीगन्नड महिला वेदिकेच्या बेळगाव जिल्हाध्यक्ष जयश्री चुनमरी यांनी व्यक्त केला.

शिंदोळी येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बेळगाव तालुका सीरीगन्नड महिला वेदिकेचे उदघाटन करून त्या बोलत होत्या . त्या म्हणाल्या कि , आजची मुले जरी इंग्रजी भाषा शिकत असली तरी , त्यांनी कन्नड भाषा ओळख टिकवण्यासाठी आणि भाषा संवर्धनासाठी पुढे यावे.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ साहित्यिक ए ए सनदी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि , कन्नड ही फक्त भाषा नाही तर जीवनशैली , संस्कृती आहे . कन्नड भाषा नष्ट झाली तर , आपली संस्कृती नष्ट होईल .त्यामुळे कन्नड भाषेचे अस्तित्व टिकण्याची जबाबदारी सर्व कन्नडवासियांची आहे .

राज्याध्यक्ष रजनी जिरग्याळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या . नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांनी अधिकाराची सूत्रे सोपवली . शाळेचे मुख्याध्यापक होलेण्णावर हमीदाबेगम देसाई जयशीला बॅकोड , सुस्मिता शेट्टी , भारती मठद , सुनीता पाटील , शाळेचे शिक्षक , विद्यार्थी आणि गावातील कन्नड लोक उपस्थित होते.


हिरा चौगला , सुनीता सोलापुरे , शिंदोलीच्या नीलव्वा मनकट्टी , रुक्मिणी तळवार , पदमा , सविता आदी उपस्थित होते . लोकगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . गिरीजा मुळगुंद यांनी स्वागत केले , सीरीगन्नड महिला वेदिकेच्या तालुका अध्यक्षा ज्योती माळी यांनी सूत्रसंचालन केले तर शुभा तेलसंग यांनी आभार मानले .

Tags:

siri-kannada-mahila-vedike-inaugurated-at-belagavi/