देवाने वरदान दिले, पण पुजारी देत नाही’, या म्हणीप्रमाणे राज्य शासनाने दिव्यांगांना दिलेली वाहने जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बेळगावात गंज खात पडली आहेत. त्यामुळे गरजू अपंग वाहन सुविधेपासू वंचित राहिले आहेत.
होय, सरकारने दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या तीनचाकी वाहनांचे पुरेशा प्रमाणात वितरण होत नसल्याने शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय परिसरात ही तीनचाकी वाहने गंज खात पडली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांचे अर्ज वाहने मिळवण्यासाठी आले असूनही शहरातील आझमनगर येथील मूकबधिर शाळेच्या आवारात तीन वाहने गंजत पडली आहेत.
या संदर्भात शारीरिक अपंग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, बेळगावात तीनचाकी वाहन मिळावे यासाठी यापूर्वीच अर्ज प्राप्त झाले आहेत. स्थानिक आमदारांच्या शिफारशीने वाहने द्यावी लागतात. लवकरच त्यांना सुपूर्द करणार असल्याचे हे अधिकारी सांगतात. शासनाने दिव्यांगांना वाहने दिली असली तरी स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नवीन वाहने शाळेच्या आवारात गंजत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना वाटप करावे, अशी सर्वांची मागणी आहे.


Recent Comments