एका महिलेने कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार शहरात घडली.
कोल्हार तालुक्यातील मट्टीहाळ गावातील शांतव्वा बसप्पा जंबगी या 35 वर्षीय महिलेने नदीत उडी घेऊन जीवन समोवले. आजारपणाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. कोल्हार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments