Banglore

मोदींच्या हस्ते कर्नाटक भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला चालना

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याच्या बहुप्रतिक्षित कर्नाटक भारत गौरव काशी दर्शन विशेष ट्रेनला बंगळुरूमधील संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला.

ही आठ दिवसांची काशी दर्शन ट्रेन यात्रेकरूंना वाराणसी, प्रयागराज, अयोध्या या पवित्र ठिकाणी घेऊन जाते. ही काशी दर्शन यात्रा भारत सरकारच्या सहकार्याने धर्मादाय विभागाने आयोजित केली आहे. या यात्रेचा एकूण खर्च 20,000 रुपये असून, त्यात सरकार 5000 रुपये अनुदान देत आहे. यात्रेदरम्यान यात्रेकरूंसाठी भोजन, निवास आणि इतर सुविधा पुरविल्या जातात. कर्नाटक भारत गौरव काशी दर्शन या विशेष ट्रेनचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी बेंगळुर-म्हैसूर-चेन्नई ‘वंदे भारत ट्रेन’लाही झेंडा दाखवून मार्गस्थ केले

यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय कायदा आणि संसदीय, खाण आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्य धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, खासदार पी. सी. मोहन, तेजस्वी सूर्या आदी मान्यवर उपस्थित होते

Tags:

karnataka-bharat-gaurav-kashi-darshan-train-inaugurated-by-prime-minister-modi/