आमच्या पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकजूट आहोत. पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यातील संबंध बिघडले असल्याची खिल्ली माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उडवली.
बेळगाव भेटीवर आलेल्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांबरा विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझे आणि डी. के. शिवकुमार यांचे संबंध चांगलेच आहेत. मात्र ते चांगले नसल्याचे सांगत भाजप नेते फिरत आहेत. भाजपमध्ये बसवराज बोम्मई आणि येडियुरप्पा यांचे संबंध चांगले आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
सिद्धरामय्या यांना एकही मतदारसंघ मिळत नसल्याच्या भाजप नेत्यांच्या टीकेबाबतच्या प्रश्नावर, भाजपवाल्यांना मेंदू नाही म्हणून ते असे बोलत फिरत आहेत. जर मला एकही मतदारसंघ मिळाला नसता तर लोकांनी मला का बोलावले असते? बदामी येथून निवडणूक लढवण्यासाठी माझ्यावर खूप दबाव आहे. हजारो मुली घरासमोर बसु, असा दबाव आणणारी पत्रं लिहित आहेत. मी विचार करतोय कारण, दर आठवड्याला एकदा तरी तिथे जाणे शक्य होत नाही. कार्यकर्त्यांना रोज भेटणे शक्य नाही. त्यांच्या सुखदुःखाला प्रतिसाद देता येत नाही. दुसरी कामे असल्याने अडचण आहे. पण ते सांगत आहेत की तुम्ही रोज येऊ नका, मात्र येथूनच निवडणूक लढवा, पण माझे मन तयार नाही. मला बदामीला जाऊन दोन महिने झाले आहेत. कोलार, वरुणा, चामराजनगरसह विविध मतदारसंघातून मिनिवडणूक लढवावी अशी मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
वरुणामधून निवडणूक लढवावी या जेडीएस अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांच्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना सिद्दरामय्या म्हणाले, ते माझे चांगले मित्र आहेत. आता मला सोडून जेडीएसचे अध्यक्ष झाले आहेत. भद्रावतीत अप्पाजीगौडा यांचे निधन झाल्यामुळे इब्राहिम यांनी जेडीएसकडून तेथूनच निवडणूक लढवावी. मी कुठे उभे राहायचे हे जेडीएस ठरवणार नाही. आमचा पक्ष निर्णय घेईल. भद्रावतीत विद्यमान आमदाराचे तिकीट टाळत इब्राहिम यांना आम्ही तिकीट दिले. पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे त्यांचा हिशोब बरोबर नसल्याची खिल्ली सिद्दरामय्यांनी उडवली. मी एकटा असलो तर लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह अनेक नेते इथे आहेत, सर्व जाती-धर्माचे लोक आमच्यासोबत आहेत असे ते म्हणाले.
कलम 15 आणि 16 आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे असे म्हणत नाही. हे माझे मत आहे. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे, असे मी म्हटले आहे. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहिल्यानंतर बघू, असे सिद्धरामय्या म्हणाले.
मोदी म्हणतात, त्यांचे डबल इंजिनचे सरकार आहे, पण पूर आला तेव्हा ते आले नाहीत. गरिबांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले. निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे ते आले आहेत. भाववाढ, बेरोजगारीत वाढ, 40 टक्के कमिशन पाहताय, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण काय केलंय त्यांनी? कंत्राटदार संघटनेने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही. मी खात नाही आणि कोणाला खावू देत नाही, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी आता काय करत आहेत, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला.
विनय कुलकर्णी यांच्या वाढदिवसावर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर बोलताना, अमित शहा यांच्यावर देखील खुनाचा आरोप होता आणि त्यांनाही हद्दपार करण्यात आले होते. ते आता देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना क्लीन चीटही मिळते. कितीतरी आमदार, मंत्र्यांवर खुनाचे आरोप आहेत. न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणीही दोषी नाही असा पलटवार सिद्दरामय्यांनी भाजप नेत्यांवर केला.


Recent Comments