दुष्टचक्र दूर सारण्यासाठी एका विशिष्ट संकल्पातून श्रीक्षेत्र येडूर येथून सुरु झालेल्या श्रीशैल जगद्गुरू पदयात्रेचे विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील सारवाडमार्गे विजापूर शहरात आगमन झाले. या पदयात्रेचे विजापूरवासियांनी भव्य स्वागत केले.
व्हॉइस : श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य द्वादशी पिठारोहण तसेच सुवर्ण जन्मोत्सवाच्या औचित्याने श्रीशैल श्री यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबर पासून ऐतिहासिक जनजागृतीपर पदयात्रा श्रीक्षेत्र येडूर पासून सुरु करण्यात आली असून सदर पदयात्रेचे आगमन विजापूरमध्ये झाले आहे. या पदयात्रेचे भव्य स्वागत विजापूरवासियांनी केले. नागरिकांनीही या पदयात्रेत सहभाग घेतला. यानंतर आमदार शिवानंद पाटील यांच्या निवासस्थानी पूजा झाल्यानंतर शहरात पदयात्रेने संचार केला. हत्ती, पालख्यांच्या सहभाग आणि अनेक भक्तांच्या उपस्थितीत आकर्षक भव्य पदयात्रा पार पडली.

यावेळी श्रीशैल जगद्गुरू डॉ. पंडित चन्नसिध्दराम शिवाचार्य स्वामी बोलताना म्हणाले, २९ ऑक्टोबर पासून आजपर्यंत सलग ३३ दिवस पदयात्रा आयोजित करण्यात येत असून ३० नोव्हेंबर रोजी सदर पदयात्रा श्रीशैल येथे पोहोचेल. त्यानंतर आंध्रप्रदेश येथील आत्मकार येथील श्रीशैलमध्ये आणि त्यानंतर भीमाम्बिका येथे पदयात्रा पोहोचेल. पदयात्रेमध्ये दरवर्षी हजारो लोक सहभाग घेतात, पदयात्रेत एक अलौकिक शक्ती आहे, असे श्रीशैल जगद्गुरूंनी सांगितले.
यावेळी मुद्देबिहाळचे आमदार ए. एस. पाटील बोलताना म्हणाले, कर्नाटकात ६८०० मठ आहेत. या मठांचे संरक्षण तसेच येथील दासोह परंपरा जपली पाहिजे. श्रीशैल जगद्गुरूंचा पदयात्रेमागील उद्देश उत्तम असून या पदयात्रेत हजारो भाविक सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यसनमुक्ती, निसर्ग संरक्षण यासह विविध विषयांवर जनजागृती करत सुरु असलेली श्रीशैल पदयात्रा ज्या ज्या भागात पोहोचत आहे त्या त्या भागात जनजागृतीसह मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या पदयात्रेमागील उद्देश हा स्त्युत्य असून श्रीशैल जगद्गुरू यांच्या या कार्याचा अनेक ठिकाणी गौरव केला जात आहे.


Recent Comments