Banglore

पौरकार्मिकांना लवकरच सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा : बोम्मई

Share

बेंगळुरसह राज्यातील महानगरपालिकेच्या पौरकार्मिकांना लवकरच सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

ब्याटरायन मतदारसंघातील बृहत बेंगळूर महानगरपालिकेच्या हद्दीतील भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर लेक पार्क पार्क उद्यान नामकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते आज समारंभपूर्वक पार पडले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरणीय आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आज देशात लोकशाही नांदत असून, देश प्रगती करत आहे. बाबासाहेबांचे आपण सदैव ऋणी राहिले पाहिजे. आरक्षण वाढवताना अनेकांनी विरोध केला असला तरी मानवतावादी मूल्यांचा विचार करून आरक्षणात वाढ करण्यात आली. राज्यकर्त्यांमध्ये दया आणि करुणा असली पाहिजे, असे ते म्हणाले.

मला नेहमीच बुद्ध-बसव-आंबेडकरांची प्रेरणा मिळाली आहे. सामाजिक न्याय देण्याचे केवळ भांडवल करणारेच जास्त आहेत. ज्यांना खरी गरज आहे त्यांना आजही न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच बंगळुरसह राज्यातील अन्य महापालिकांमधील पौरकार्मिकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठी पावले उचलली जातील असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

यावेळी समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ आदी उपस्थित होते.

Tags:

bangalore cm bommai