Banglore

कृषी मेळा-2022 च्या समारोपात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज कृषी मेळा-2022 च्या समारोप समारंभात शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान केले.

बंगळुरात गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने कृषी विद्यापीठ, भारत सरकार, भारत सरकारचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि कर्नाटक सरकारच्या विविध विभागांच्या सहकार्याने “कृषी मेळा-2022” चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप समारंभ आज पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोम्मई सहभागी झाले होते. यांच्याहस्ते प्रगतीपर शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.


यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, या पृथ्वीमातेच्या मातीच्या अफाट आणि अद्भूत शक्तीचा क्षणभर विचार केला तर आपण आपले जीवन या पृथ्वीमातेशी जोडले आहे, याबाबत आपल्याला धन्यता वाटते. जर तुम्ही एक बीज लावले तर ती माता पृथ्वीच तुम्हाला दुसरे बीज देते. इतर कोणत्याही क्षेत्रात हे शक्य आहे का..? एखाद्या कारखान्यात एखादी वस्तू तयार करायची म्हणजे एका उत्पादनात शेकडो उत्पादने टाकली जातात. पण पृथ्वीत एक बी पेरले तर शंभर बिया काढता येतात. अशी शक्ती असली पाहिजे. याची जाणीव ठेवून शेती केली पाहिजे. आपण आपल्या आई-वडिलांप्रमाणे पृथ्वी मातेची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.

आपले संपूर्ण जीवन मातृभूमी आणि आपल्या आईच्या कुशीत आहे. आईच्या उदरातून जगा, पृथ्वीच्या गर्भातूनच जगा. पण जर आपण याची जाणीव ठेवली नाही आणि शेतीला एक अपरिहार्य व्यवसाय बनवला तर ते आपल्या आणि आपल्या देशासाठी नक्कीच चांगले होणार नाही. आपण आपल्या पृथ्वीमातेशी आणि आपल्या व्यवसायाशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे असा कानमंत्र बोम्मई यांनी दिला.

यावेळी कृषी मंत्री बी. सी.पाटील, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, आमदार कृष्णा बैरेगौडा आदी उपस्थित होते.

Tags:

cm bommaiah krushi mela in banglore