Banglore

कोटी कंठ गायन उपक्रमाला मुख्यमंत्र्यांकडून चालना

Share

कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे आयोजित कोटी कंठ गायन उपक्रमाला आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरात चालना दिली.

67 व्या कन्नड राज्योत्सवाचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरू येथील कंठीरव स्टेडियमवर कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे आयोजित कोटी कंठ गायन कार्यक्रमात भाग घेतला आणि कोटी कंठ गायनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, डी. व्ही. सदानंद गौडा, मंत्री आर. अशोक, व्ही. सुनील कुमार, खासदार पी.सी. मोहन, तेजस्वी सूर्या, राज्यसभा सदस्य जगेश यांच्यासह हजारो विद्यार्थी आणि कलाकार सहभागी झाले होते.

Tags:

bangalore singing program