Banglore

हिजाब विवाद आता सर्वोच्च न्यायमूर्तींच्या विस्तृत खंडपीठाकडे

Share

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गात मुस्लिम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या अपीलांवर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज राखीव निकाल जाहीर केला. दोन न्यायमूर्तींनी वेगवेगळा निकाल दिला. त्यामुळे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अंतिम निर्णय येणार आहे.

होय, कर्नाटकात मोठा वाद निर्माण करणाऱ्या हिजाबसंदर्भातील अपील याचिका फेटाळण्याच्या बाजूने न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी निकाल दिला आहे, तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्यासमोर येणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्तींच्या विस्तृत खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याचा निकाल येईपर्यंत हिजाब प्रकरणी यथास्थिती कायम राहणार आहे.

शिक्षण संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी फेटाळून लावली. तर न्यायमूर्ती धुलिया यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मत व्यक्त केले की आवश्यक धार्मिक प्रथा पाळण्याबद्दल वाद घालण्याची गरज नाही असे त्यांनी निकालात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी विस्तृत घटनापीठाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे.

Tags:

hijab-case-transper-to-suprem-court