hubali

आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी दुर्दैवी : मुख्यमंत्री बोम्मई

Share

पीएफआयवर बंदी का घातली हे विचारण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. यापूर्वी त्यांनी स्वतः पीएफआयवरील खटले निकाली काढले होते. ते लपवण्यासाठी आता आरएसएसवर बंदी घालण्यास सांगत आहेत असा टोला बसवराज बोम्मई यांनी हाणला.

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावर आज प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, देशात पूरपरिस्थितीसह कोणत्याही संकटकाळात आरएसएस पुढाकार घेऊन काम करते. तसेच देशभक्ती जागृत करण्याचे काम करत आहे. अशा देशप्रेमी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी सिद्धरामय्या यांनी करणे हे दुर्दैवी आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. त्यावर माझे वैयक्तिक मत नाही. ही त्यांच्या पक्षाची वैयक्तिक बाब आहे असे बोम्मई म्हणाले.

Tags:

cm bommai rss hubli cm rss cm bommai