देशविघातक कृत्यांना या देशात कदापि जागा नसेल… हे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून भविष्यात देखील असेच निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
पीएफआय संघटनेवर बंदी घालण्यात आली असून या प्रकरणी बेंगळुरू मधील आर टी नगर येथील गृहकचेरीत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोक प्रशिक्षणासाठी परदेशात गेले असून परदेशातूनच काही लोक कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून या संघटनेचा समाजविघातक कृत्यांमध्ये मोठा सहभाग असून कर्नाटकात देखील झालेल्या अनेक घटनांमागे या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशद्रोही कारवाया करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी सर्व राज्यातील जनतेने एकमताने केली असून विरोधी पक्ष, सीपीआय, काँग्रेस, सीपीएम या सर्वांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


Recent Comments