शेजारच्या महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजयमहांतेश दानम्मनवर यांनी काल, शनिवारी भीमा नदीतीरावरील गावांना भेटी देऊन संबंधित ग्रामस्थांना सावध केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजयमहांतेश दानम्मनवर यांनी काल प्रथम धुळखेड पुलावर जाऊन निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी चनेगाव येथील शासकीय कन्नड मुलांची शाळा व अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी दानम्मनवर म्हणाले की, उजनी जलाशयातून 91 हजार क्युसेक्स आणि भीमा नदीच्या उपनद्यांमधून 40 हजार क्युसेक्स पाणी कर्नाटक राज्यात दाखल होणार आहे. एकूण 1.31 लाख क्युसेक्स पाणी कर्नाटक राज्यात दाखल होणार आहे. मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीत सोडले जात असल्याने नदीतीरावर येणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी पुरेशी खबरदारी घ्यावी. नदीजवळ जाऊ नका. गुरांना नदीत सोडू नये, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येणार असल्याने भीमा काठावरील लोकांनी घाबरून जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी असे सांगून त्यांनी, लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. भीमा नदी अजूनही दुथडी भरून वाहत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये फिरत असताना इंडी तालुक्यातील हिंगणी गावालाही भेट दिली. ग्रामस्थांशी बोलून काळजी घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी इंडी उपविभागाचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र गडदे, चडचण तहसीलदार एच. एन. शिरहट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते. फ्लो


Recent Comments