Belagavi

बीम्स स्पेशालिटी हॉस्पिटल मजल्यांचे डिसेम्बरमध्ये उद्घाटन

Share

डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात बीम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.

बीम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांची भेट घेतल्यानंतर आ. बेनके यांनी माध्यमांशी संवाद साधला. डिसेंबरच्या हिवाळ्यात हे अधिवेशन बेळगावात होणार असून त्यावेळी बेळगाव शहरात प्रगतीच्या टप्प्यावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नजीकच्या काळात माता व बाल रुग्णालयाच्या उभारणीचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची समस्या उद्भवू नये, ऑक्सिजनची अडचण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, विजेची अडचण आल्यास ऑक्सिजन पुरवण्यासाठी जनरेटर सज्ज असावा, असे ते म्हणाले.

याआधी बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांची भेट घेतली. या बैठकीत दाखल करून घेण्यात येत असलेल्या रुग्णांची माहिती देण्यात आली. नित्यनियमित बायोमेट्रिक प्रणाली योग्य प्रकारे काम करायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रक्तपेढी, क्ष-किरण, डायलिसिस २४ तास उपलब्ध असायला हवे, असे ते म्हणाले.

Tags: