देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहादींवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना मदत करणाऱ्या पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांवर बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने शनिवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
देशात अलीकडच्या काळात निष्पाप हिंदूंच्या हत्या वाढल्या आहेत. अल्पसंख्यांकांना भडकावणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करावी. या कटात सहभागी असलेले नेते, मौलवी, चिस्ती, धार्मिक नेते आणि विदेशी संघटना यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. यासाठी बेकायदेशीर क्रियाकलाप विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी करून हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिहादींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीराम सेना, हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी रवी कोकितकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, देशात जिहादी प्रवृत्तींच्या चिथावणीमुळे निष्पाप हिंदूंच्या हत्या होत आहेत. हिंदूंवरील अन्य दूर करण्यासाठी लढणाऱ्या भाजप आमदार राजाजी ठाकूर यांना अन्यायाने तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यांची सन्मानाने सुटका करून त्यांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. बाईट
यावेळी बोलताना हिंदू जनजागृती समितीच्या नेत्या सरिता गणेश म्हणाल्या, अल्पसंख्यांक जिहादींकडून भारतात देशविरोधी कृत्ये केली जात आहेत. त्यांच्याकडून निष्पाप हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करून कडक शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
एकंदर, देशविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनेला हद्दपार करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.या आंदोलनात ऋषिकेश गुर्जर, मारुती सुतार, व्यंकटेश शिंदे आदींसह हिंदु जनजागृती समितीचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments