बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीकडे पालकमंत्री दुर्लक्ष करत आहेत. अतिवृष्टीमुळे लोकांचे हाल होत असले तरी त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत मंत्री गोविंद कारजोळ यांच्याविरोधात केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गोकाकच्या हिल गार्डन कार्यालयात आज, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, गेल्यावेळीही अतिवृष्टीनंतर सरकार किंवा मंत्र्यांनी पुरपीडितांची विचारपूस केली नाही. यंदाही तोच प्रकार सुरू आहे. पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काहींना अन्यत्र हलवण्यात आले तर काहींना असेच वाऱ्यावर सोडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
यमकनमर्डी येथे मला लक्ष्य करून उपयोग नाही. लोकांचा पाठिंबा आम्हाला असताना भाजप आमचे काही वाकडे करू शकत नाही. भाजप सत्तेसाठी वेगळ्या वाटेने जात असल्याचा टोला यावेळी सतीश जारकीहोळी यांनी लगावला.
जनस्पंदन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी विरोधकांचा दम काढण्याबाबत केलेले वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला आमच्या नेत्यांनी आधीच उत्तर दिले आहे. भाजपच्या जनस्पंदन कार्यक्रमाला किती लोक होते? खुर्च्या रिकाम्या असल्याचे आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये पाहिले आहे अशी खिल्ली सतीश जारकीहोळी यांनी उडवली.
केपीटीसीएल परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी 20 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. केवळ अटक करून उपयोग नाही. पैसे देऊन नोकरी मिळण्याची स्थिती निर्माण झाली तर कष्टाने शिक्षण घेतलेल्यांवर अन्याय होईल. त्यामुळे यातील दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी. त्याचवेळी अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कारवाई करावी, अशी मागणी सतीश जारकीहोळी यांनी केली. बाइट


Recent Comments