दिवंगत उमेश कत्ती यांची राजकीय विचारधारा अद्वितीय अशी होती. त्यांच्या जाण्याने राज्याचे आणि भाजपचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री एमटीबी नागराज यांनी दिली.
बेळगावमध्ये सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
उमेश कत्ती यांच्या अकाली निधनामुळे भाजपसहराज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी राजकारणात प्रवेश घेतलेल्या उमेश कत्ती यांचा अनुभव खूप मोठा होता. त्यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासाची अनेक स्वप्ने पहिली होती, असेही एमटीबी नागराज म्हणाले.


Recent Comments