बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भात सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी सरकारने कन्नड संघटनांची बैठक बोलवावी, असा आग्रह करत आज विविध कन्नड संघटनांनी आंदोलन छेडले.
व्हॉइस : शनिवारी करवेच्या नारायंगौड गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. यावेळी बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भात सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी सरकारने कन्नड संघटनांची बैठक बोलवावी, असा आग्रह करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी म्हणाले, सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सीमाप्रश्नासंदर्भातील अंतिम टप्प्यातील निर्णयासंदर्भात कर्नाटक सीमा संरक्षण आयोग पूर्णपणे निष्क्रिय ठरत आहे. सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करून कोणताही उपयोग न झाल्याने कन्नड संघटनांची सभा बोलावून चर्चा करण्याचा आग्रह त्यांनी केला.

याचप्रमाणे महादेव तळवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या सीमा समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव सीमाप्रश्नी उत्तम बाजू मंडळी आहे. मात्र कर्नाटक सरकार बाजू मांडण्यात मागे आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे बैठक घेऊन कन्नड संघटनांचे विचार जाणून घेण्यात आले त्याचप्रमाणे आताही कन्नड संघटनांची बैठक बियॉलविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

यावेळी करवे राज्य संचालक महादेव तळवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश मगेन्नावर, जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी, देवेंद्र तळवार, सतीश गुडगन्नवर, हॉलप्पा सुलदाळ आदी उपस्थतीत होते.


Recent Comments