राज्यातील भाजपचा जन्म भ्रष्टाचारातून झाला आहे. मुंबई येथील काँग्रेस आणि जेडीएस आमदारांना ब्लॅकमेल करून भाजप सत्तेवर आला असून भ्रष्टाचाराशी कधीही तडजोड करणार नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील भ्रष्टाचारावर मौन का पाळले आहे असा सवाल आम आदमी पक्षाचे नेते भास्कर राव यांनी उपस्थित केलाय.
व्हॉइस : बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. कर्नाटकातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मौन का पळत आहेत? या सरकारमध्ये ४० नव्हे ते ५० टक्के भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुद्द ठेकेदारांनी केला असून पुएसआय भरती भ्रष्टाचारदेखील कर्नाटकात झाला आहे. यामुळे हजारो परीक्षार्थींचे भवितव्य अनिश्चित आहे. कोरोना संदर्भात आरोग्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मंत्री मुनिरत्न यांच्यावरदेखील कारवाई व्हावी, तसेच मंगळुरु दौऱ्यावर येणारे पंत्रप्रधान या भ्रष्टाचारावर कोणते पाऊल उचलतील हे पाहावे लागणार असे भास्कर राव म्हणाले.
याआधी बिटकॉइन घोटाळ्याची चर्चा होती. याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पुढे आले होते. बिटकॉइन हा जागतिक स्तरावरील घोटाळा आहे. यामध्ये पंतप्रधानांनी कोणावर कारवाई केली, असा सवाल भास्कर राव यांनी केला, पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना असा कोणताही घोटाळा झाला नाही मात्र आपण शहर सोडल्यानंतर बिटकॉइन घोटाळा झाला, याप्रकरणी आयएएस अधिकारी मूग गिळून गप्प बदलाचा आरोपही त्यांनी केला.
भास्करराव पुढे म्हणाले, राज्य सरकार माफियांमध्ये बुडाले आहे. संपूर्ण भगवेकरण करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही मात्र जनतेची सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकायुक्तांसदर्भात ११ ऑगस्ट रोजी आदेश आला आहे. परंतु २० दिवस उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. जी प्रकरणे तपासाधीन आहेत ती एसीबींकडून लोकायुक्तांकडे वर्ग करण्यात यावीत, कलम २ नुसार सीआरपीसीने अधिकार दिले तरच लोकायुक्तांना अधिकार मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.
२०२३ साली होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार या प्रश्नावर उत्तर देताना भास्कर राव म्हणाले, पक्षाच्या निर्णयानुसार आपण निवडणूक लढविणार असून यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल, यासाठी अजून बराच कालावधी असल्याचे भास्करराव म्हणाले.
मुरुगा शरण प्रकरणी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, कर्नाटकात स्वामींना खूप आदर आहे परंतु दुसऱ्या बाजूला मुलांवर झालेला अन्यायाबाबतही दुःख आहे. याप्रकरणी दोघांनाही न्याय द्यावा लागणार असून हे प्रकरण संपूर्ण राज्यासाठी धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी योग्यप्रकारे चौकशी करून सत्य उलगडण्याची गरज असून पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितली. शिवाय याप्रकरणी तपास प्रक्रियेत कोणीही हस्तक्षेप करू नये असा सल्लाही त्यांनी दिला.
सावरकर फोटोवरून राज्यात सुरु असलेल्या वादविवादासंदर्भात बोलताना भास्कर राव म्हणाले, शूरवीरांच्या फोटो रस्त्यावर आणून त्यांचा आणि त्यांच्या बलिदानाचा अपमान होत आहे. कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाला कमी लेखू नये असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राजकुमार टोपण्णावर यांच्यासह आम आदमी पक्षाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments