रायबाग तालुक्यातील हंदीगुंद या गावातील ग्रामपंचायत व्याप्तीतील सरकारी जमिनीवर गेल्या ६० वर्षांपासून काही गरीब कुटुंब वास्तव्य करत असून या कुटुंबियांच्या नावे हि जागा करून त्यांना हक्कपत्र देण्यात यावीत, या मागणीसाठी हंदीगुंद ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
रायबाग तालुक्यातील हंदीगुंद या गावात अनुसूचित जाती आणि जमातीसह इतर समाजामध्ये मोडणाऱ्या काही गरीब कुटुंबं येथील सरकारी जमिनीवर गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सर्व्हे क्रमांक १२ मधील मनसमट नावाच्या ९ एकर १३ गुंठे जमिनीवर ३०० हुन अधिक कुटुंबं वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत अधिकार्यांनीही येथील गरिबांसाठी विविध प्रकल्पांतून घरे बांधली आहेत. काही कुटुंबांना हक्कपत्रे देण्यात आली आहेत, तर अनेक कुटुंब यापासून वंचित आहेत. २०१७-१८ पासून येथे नवीन घरे मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची तातडीने सोय करावी अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सोपविण्यात आले. 
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना चिन्नाप्पा गरडी यांनी सांगितले कि, गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सर्व्हे क्रमांक १२ मधील मनसमट नावाच्या ९ एकर १३ गुंठे जमिनीवर ३०० हुन अधिक कुटुंबं वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत अधिकार्यांनीही येथील गरिबांसाठी विविध प्रकल्पांतून घरे बांधली आहेत. tr अनेक कुटुंबं यापासून वंचित आहेत. यासंदर्भात तहसीलदार, एस्सी आणि स्थानिक आमदारांना आवाहन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. या ठिकाणी पंचायतीने आम्हाला घर दिले आहे. आत्तापर्यंत आम्हाला जे कर भरायचे आहेत ते सर्व भरण्यात आले आहेत. मात्र आम्हाला हक्कपत्र देण्यात आलेले नाही हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.
यावेळी चिन्नाप्पा गुग्गरी, मारुती अज्जप्पगोळ, रमेश देवरवर, महालिंग देवरवर आदींसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments