सदाशिवनगर येथील गौरी महिला मंडळाचा दहावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला खासदार मंगला अंगडी आणि ज्येष्ठ साहित्यिका नीलगंगा चरंतीमठ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
खास मंगला अंगडी यांच्याहस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नळगंगा चरंतीमठ यांनी अध्यक्षीय भाषणात कन्नड भाषेचे महत्व पटवून दिले. (फ्लो)
आपल्या भाषणात नीलगंगा चरंतीमठ म्हणाल्या, कन्नड हि आपली मातृभाषा असून आपल्या भाषेचा आदर प्रत्येकाने करून भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मातृभाषेप्रमाणेच इतर भाषा शिकणेही तितकेच महत्वाचे असल्याचे चरंतीमठ यांनी सांगितले.
नीलगंगा चरंतीमठ पुढे म्हणाल्या, आपण जिथे राहतो, जिथली हवा, पाणी आणि श्वास घेतो तेथील सर्व गोष्टींचा आदर करावा. कन्नड भाषेचा वापर वाढवावा असेही त्यांनी सांगितले. ()
यावेळी रत्नप्रभा बेल्लद बोलताना म्हणाल्या, प्रत्येक महिलेने आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करावा. अनेक महिला मंडळ स्थापन केली जातात मात्र काही वर्षानंतर हि महिला मंडळे बंद होतात. गौरी महिला मंडळ गेल्या १० वर्षांपासून कार्यरत आहे. विविध समाजाभिमुख उपक्रम या महिला मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात, त्यामुळे आणखी काही नवीन उपक्रम माहित असल्यास ते मंडळाच्या निदर्शनात आणून देण्याचे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी नगरसेविका सविता कांबळी, माजी नगरसेविका सरला हेरेकर, गौरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता गोकाक, उपाध्यक्षा अन्नपूर्णाया दम्मनगी, शशिकला नाडगौडा, डॉ. शिल्पा वागराळी, पूजा बडवाळे आदींसह इतर महिला उपस्थित होत्या.


Recent Comments