स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांबद्दल जनजागृती व्हावी आणि सावरकरांचे छायाचित्र समविचारी लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी भाजपतर्फे बेळगावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनापासून रॅलीला सुरुवात झालेल्या भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हातात सावरकरांची प्रतिमा घेऊन वंदे मातरम, भारत माताकी जय आणि सावरकरांचा जयघोष केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रिक्षा आणि अन्य वाहनांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची छायाचित्रे चिकटवण्यात आली.
भाजपचे जिल्हा सचिव महांतेश वकुंद, म्हणाले, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या वयाला न शोभेल असे, ‘सावरकर कोण आहेत..? त्यांचे छायाचित्र मुस्लिम भागात का लावले जात आहे?’ असे भेदभावपूर्ण विधान करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या देशाच्या भल्यासाठी 27 वर्षे तुरुंगवास भोगलेल्या, या मातीचे पुत्र म्हणून सावरकरांनी केलेले परोपकार जनतेलाही समजावेत, यासाठी आपण जनजागृती करत आहोत असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना, महांतेश वकुंद म्हणाले, सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना बंगळुरूमधील सावरकर फ्लायओव्हर आणि तुमकूरमधील सावरकर पार्कचे उद्घाटन झाले. त्याची आठवण आता त्यांना आहे की नाही हे माहीत नाही. पण आता सत्तेच्या सिंहासनावर बसण्याच्या उन्मादात सिद्धरामय्या स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी घाणेरडे राजकारण करत आहेत. स्वतःच गौरविलेल्या सावरकरांवर टीका करत आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी भाजप नेते मुरुगेन्द्रगौडा पाटील, लीना टोपण्णावर, सदानंद गुंडेप्पन्नावर यांच्यासह भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments