पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बेळगावमधील विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत दिवंगत सुरेश अगदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला बेळगाव – धारवाड रेल्वे प्रकल्प यासह बळ्ळारी नाला, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ आणि इतर अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.
दिवंगत सुरेश अंगडी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्प एका टप्प्यावर पोहोचला असून यासाठी ४४४ एकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती जिला पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. या प्रकल्पासाठी एका आठवड्यात
अधिसूचनाही जाहीर होईल, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.
बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्प हे स्वर्गीय सुरेश अंगडी यांचे स्वप्न होते. रेल्वेमंत्री असताना त्यांनी या संदर्भात खूप काम केले होते.हा प्रकल्प अशा टप्प्यावर पोहोचला आहे ज्यामध्ये ४४४ एकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासंदर्भात येत्या आठवड्याभरात अधिसूचना जाहीर केली जाईल. १५० एकर जागेसाठी उद्या अधिकाऱ्यामार्फत अधिसूचना जाहीर होईल, यासाठी अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद करण्यात आली असून रेल्वे विभागाने हे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशी विनंती त्यांनी केली. ()
यावेळी चोर्ला मार्गाच्या विकासासंदर्भात देखील पालकमंत्र्यांनी चर्चा केली. चोर्ला मार्गावर ९ महिने पाऊस असतो. यामुळे या रस्त्याचे सिमेंटीकरण झाले पाहिजे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली चर्चा झाली असून जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. सांबारा येथे १०० एकर जमीन संपादित करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येत असून या कामाची परवानगीही केंद्रीय प्राधिकरणाकडून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.()
बळ्ळारी नाल्याच्या समस्येसंदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले, या समस्येवर चर्चा करण्यासाठी शेतकरीही माझ्याकडे आले होते. राष्ट्रीय महामार्ग निर्माण केल्यामुळे अशा अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून महामार्ग अधिकारी, सिंचन विभाग आणि पालिका अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली आहे. त्यांच्याकडून आलेल्या अहवालानंतर आपण या समस्येवर विचार करून तोडगा काढू असा विश्वास देखील पालकमंत्र्यांनी व्यक्त केलाय.()
यावेळी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकरी दर्शन एच व्ही आदींसह इतर विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.


Recent Comments