बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी तिरंगायात्रा आज गोकाक शहरात काढण्यात आली.
अखिल भारत विद्यार्थी परिषद आणि गोकाक शून्य संपादन मठ यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा अभियानांतर्गत ही यात्रा काढण्यात आली.
राष्ट्रीय स्वयं-सेवक संघाचे विभागीय समन्वयक एम.डी. चुनमरी यांनी भव्य तिरंगा यात्रेचा शुभारंभ केला.
गोकाकमधील चन्नबसवेश्वर विद्यापीठातून हनुमान मंदिर मार्गे तिरंगा यात्रा भापना कूट, शेट्टी कूट, अप्सरा कूट, सांगोली रायण्णा सर्कल मार्गे बसवेश्वर सर्कलपर्यंत ही यात्रा काढण्यात आली. चौकात १०० मीटर भव्य ध्वजाला आयताकृती धरून राष्ट्रगीत गाऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जयचा जयघोष केला. मुरुगराजेंद्र महास्वामी, तहसीलदार प्रकाश होलेप्पागोळ, बीईओ जी.बी. बालगार, नगरपालिका आयुक्त शिवानंद हिरेमठ, लक्ष्मी एज्युकेशन ट्रस्टचे संचालक सर्वोत्तम जारकीहोळी, अभाविपचे नेते प्रकाश साठे आदी मान्यवर यावेळी सहभागी झाले होते.


Recent Comments