गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर पडून बेघर झालेल्या एका कुटुंबाची अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नसून सदर कुटुंब गंजी येथील मठात वास्तव्य करत आहे. घर नाही, काम नाही शिवाय पतीची तब्येतदेखील ठीक नाही अशा अवस्थेतील या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
व्हॉइस : गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त अद्यापही भरपाईच्या प्रतीक्षेत असून अशा अनेक नुकसानग्रस्तांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याच संकटात सापडलेल्या एका कुटुंबाची परवड होत असून गेल्या दोन वर्षांपासून घराविना हे कुटुंब गंजी येथील मठात वास्तव्य करत आहे. चार मुले, आजारी पती यांच्यासह जीवनाचा गाडा ओढणे कठीण झाले असल्याची परिस्थिती आपल्यावर आली आहे अशी व्यथा या कुटुंबातील महिलेने व्यक्त केली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंजुळा पुजारी या महिलेने सांगितले, गेल्या दोन वर्षांपासून आपण या मठात राहात आहोत. चार मुले आणि आजारी पती यांना घेऊन आपण या केंद्रात राहत असून प्रशासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केले आहे. कामकाज करणारे कोणीही नसल्यामुळे गावोगावी जाऊन भिक्षा मागण्याची वेळ आपल्यावर आली आहे. प्रशासनाने आपल्या या समस्येकडे गांभीर्याने पाहून आपल्याला मदत पुरवावी असे आवाहन पुजारी यांनी केले.
अडवय्या पुजारी यांनी सांगितले कि, आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती पंचायतीला देण्यात आली होती. प्रत्येक वेळी आपण घरी येऊन पाहणी करू असे आश्वासन आपल्याला देण्यात आले. मात्र अद्याप आपल्यासाठी घर मंजूर झाले नाही, अशा परिस्थितीत आपण कोणाकडे न्याय मागावा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी एका दुसऱ्या कामासाठी आलेले युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या निदर्शनात हि बाब आली. अशा अनेक महिला आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडत असून आपल्या मुलांसहित त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आवाहन केले आहे. हि बाब पाहणे आपल्याला सहन होत नसल्याचे हेब्बाळकर म्हणाले. ज्यांच्याकडे घर नाही अशांची नावे नोंद करून घेऊन तालुका पंचायत आणि आमदारांच्या माध्यमातून शक्य तितकी मदत आपण करू असे आश्वासन त्यांनी केले.
माविनकट्टी या गावात २५ हुन अधिक महिला बेघर आहेत. येथील संतप्त महिलांनीदेखील आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून प्रशासन आता या महिलांची समस्या कशापद्धतीने सोडवेल? यांना नुकसान भरपाई मिळेल का? असे प्रश्न उपस्थित होत असून अशा समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशीही मागणी होत आहे.


Recent Comments