बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील नारायण वामन भाश्कळ यांच्या घराची भिंत अतिवृष्टीने कोसळली. त्यामुळे जवळपास पाच लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे.
होय, बिजगर्णी गावातील नारायण वामन भाश्कळ यांच्या घराची भिंत गुरुवारी रात्री अतिवृष्टीने कोसळली. त्यामुळे घरातील प्रांपचिक साहित्य व धान्याचे देखील नुकसान झाले आहे. ग्राम पंचायत आणि गावातील ग्रामस्थ कमीटी सदस्य वसंत अष्टेकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी आहे. 
गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ब्रम्हलिंग गल्ली, बिजगर्णी येथील नारायण वामन भाश्कळ यांच्या घराची भिंत कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर उर्वरीत घर देखील कोसळून पडण्याच्या अवस्थेत आहे. नारायण वामन भाश्कळ याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या घराची एक भिंत काल, गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळली. यावेळी भाश्कळ कुटुंबीय घरातच झोपले होती. ही भिंत बाजूच्या जागेत पडल्याने यामुळे अनर्थ टळला. घराच्या छपराचा मुख्य आधार असलेले पाष्ट (मुख्य लाकूड) मोडून छप्पर अर्धवट मोडले आहे. याबाबत नारायण भाश्कळ यांनी प्रसारमाध्यमं माहिती दिली.
दरम्यान, पावसामुळे घराची भिंत पडल्याचे समजताच गावातील लोक सहकार्य करण्यासाठी धावले. ग्राम सेवक व तलाठी यांनी घराला भेट देऊन पाहणी केली.
भाश्कळ यांची परिस्थिती बेताचीच असून, घर कोसळल्यानंतर त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. एकीकडे गणेश चतुर्थी उत्सव तोंडावर असतानाच हे संकट उभे ठाकल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सद्यः परिस्थितीत घर दुरुस्ती करणे भाश्कळ यांना शक्य नसल्याने सरकारने घर बांधण्यासाठी मदत करावी, अशी नारायण भाश्कळ यांची मागणी आहे.


Recent Comments